Mask Group संचलित
डॉ.सौ.वैशाली & डॉ.श्री विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने डॉक्टर आपल्या दारी” ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय फिरता दवाखाना” ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 5-07-2025 रोजी रामपूर गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली. रामपूर मध्ये 102 रुग्णांना मोफत रुग्णसेवा देऊन आरोग्य तपासणी व दंत उपचार करण्यात आला.
विश्वस्त श्री पारस तलाठी यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये विश्वस्त रितेश पी. शहा, जवाहर शहा, सुजीत स्वामी राजेंद्र मेहता, मिलींद मेहता व R.C भैया हजर होते. मेडिकल ऑफिसर डॉ. सौ. खुषबू बागबान स्टाफ मेंबर रियाज बोरगावे, रुपाली शेळके, राहुल ताडे, गजानन कांबळे, तसेच डेंटल विभागमधिल डॉ. ओमकार जाधव स्टाफ निखील हेगडे हजर होते.
शिबीर मध्ये ग्रामस्थ श्री वीनू पाटील, सचीन पवार, आण्णासाहेब तारळे, युवराज पाचुवडे, यांची मोलाची मदत मिळाली. विश्वस्त श्री राजू मेहता यांनी दवाखान्याची माहीती देऊन रामपूर ग्रामस्थांचे आभार मानले.