Mask Group संचलित
डॉ.सौ.वैशाली & डॉ.श्री विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.
निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने डॉक्टर आपल्या दारी” ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय फिरता दवाखाना” ची सुरुवात केली आहे.
शनिवार दि. 26-04-2025 रोजी शिप्पूर गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली. शिप्पूर मध्ये 148 रुग्णांना मोफत रुग्णसेवा देऊन आरोग्य तपासणी व दंत उपचार करण्यात आला.
विश्वस्त श्री अवीराज शहा यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये विश्वस्त सतीश वखारीया,मिलींद मेहता, रितेश पी. शहा, राजेंद्र मेहता, जवाहर शहा,सुजीत स्वामी, सुरज राठोड अमीत शहा,अक्षय पुरंत तसेच प्रतिक शहा यांनी आभार मानले यावेळी ग्रामस्थ भाऊराव कांबळे चेअरमन, दत्तात्रे खराडे सदस्य, पांडुरंग शींदे,संजय माने, शीवाजी खराडे, विजय पवार तसेच महादेव पाटील ग्रा्.पं. कर्मचारी, डॉ. ,विशाल शींदे, स्टाफ मेंबर राहुल ताडे,आरती सिस्टर,इंद्रजीत कांबळे, गजानन कांबळे, तसेच डेंटल विभागमधिल डॉ. ओंमकार जाधव स्टाफ ज्योती निकम हजर होते.
हे शिबीर यशस्वी करणेसाठी शीप्पूर सर्व ग्रामस्थांची मोलाचे सहकार्य केले.