मास्क ग्रुप व डॉ. अग्रवालस् अंकुर डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखाना आणि डॉ. अग्रवाल यांच्या अंकुर डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 13-08-2025 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी 10:00 ते सायं.6:00 वाजेपर्यंत आयोजित केलेल्या या शिबिरात 228 रुग्णांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली.
शिबिरात आलेल्या अनेक रुग्णांना मोतीबिंदू (cataract) आणि काचबिंदूचे (glaucoma) निदान झाले. तर काहींच्या चष्म्याचा नंबर बदलण्यात आला. तसेच अनेक रुग्णांना डोळ्यांच्या विविध आजार आणि विकारांविषयी माहिती व योग्य मार्गदर्शन मिळाले. शिबिरात नेत्रचिकित्सक डॉ. सदानंद पाटणे यांनी स्वतः रुग्णांची तपासणी केली. त्यांचे असिस्टंट डॉक्टर, नेत्रचिकित्सक स्टाफ आणि त्यांची आधुनिक तपासणी मशिनरी यांचीही मदत लाभली.
यावेळी ज्या रुग्णांना चष्म्याचा नंबर आला अश्या रुग्णांना 50% पेक्षा कमी दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मास्क ग्रुपचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
हे शिबीर यशस्वी पार पाडणे साठी विश्वस्त श्री सुजीत स्वामी, रितेश पी. शहा, अध्यक्ष श्री प्रकाशभाई शहा, उपाध्यक्ष श्री सतीश वखारिया व सर्व विश्वस्तांची मोलाची मदत मिळाली.