प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी 2 जुलै 2025 रोजी निपाणीतील डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ, सेवार्थ दवाखान्याला भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्यातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला आणि रुग्णांना अत्यंत माफक दरात मिळणाऱ्या उपचारांची माहिती घेतली.
मास्क ग्रुप अध्यक्ष श्री प्रकाश भाई यांचे तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री. कऱ्हाडे यांनी चार वर्षांपूर्वी पाहिलेला लहान दवाखाना आज भव्य 5 मजली इमारतीत विस्तारलेला पाहून खूप आनंद झाल्याचे सांगितले. हे सर्व विश्वस्त, देणगीदार आणि शुभचिंतकांमुळे शक्य झाले असे ते म्हणाले. दवाखान्याचे नियोजनबद्ध कार्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले आणि संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष प्रकाश भाई कडून संस्था उभारणी कशी करावी हे शिकण्यासारखे आहे असेही ते म्हणाले. प्रतीक शहा यांच्याशी असलेल्या जुन्या मैत्रीमुळे निपाणीबद्दल त्यांना आपलेपणा वाटतो. शेवटी त्यांनी सर्वांना उत्तम आरोग्य मिळो अशी सदिच्छा व्यक्त करत सर्व विश्वस्त, डॉक्टर्स व स्टाफ मेंबर्स चे अभिनंदन केले.