Mahaveer Charity Hospital

MASK GROUP's

Dr. Sou. Vaishali & Dr. Vilas Parekh

Mahaveer Arogya Seva Sangh, Nipani

Sevarth Hospital

Donation of Rs. 50,000 from Shri. Ashish Mehta

Home Donation of Rs. 50,000 from Shri. Ashish Mehta
Donation of Rs. 50,000 from Shri. Ashish Mehta

Donation of Rs. 50,000 from Shri. Ashish Mehta

सौ.स्नेहलता अशोक भाई मेहता यांच्या नावे अमेरिकास्थित आशिष मेहता यांचेकडून 50 हजार रुपयाची रुग्णसेवा.

”मानवता परमो धर्म” ह्या संकल्पनेने सुरू केलेली महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी रुग्ण सेवेमध्ये नव-नवीन उच्चांक गाठत आहे. रुग्णसेवे बरोबरच ”माणुसकीचे दर्शन” घडवित कोरोना काळात रोज गरजू लोकांना मोफत एक वेळचे जेवण देत आहे. भुकेल्या जीवांना आधार बनून मुक प्राण्यांची सुद्धा सोय करीत आहे. ह्या सर्व निस्वार्थ भावनेने करीत असलेल्या कार्याची दखल साता-समुद्रापार पोहोचली आहे. अमेरिकास्थित श्री.आशिष अशोकभाई मेहता (Global Infra Service, America) यांनी निपाणी ”मातृभूमीचे बंध” आणि सामाजिक बांधिलकीतून आपल्या मातोश्रीसौ.स्नेहलता अशोक भाई मेहता यांचे नावे रु.50,000 देणगी दिली आहे. आजच्या या दुर्देवी घडी व अतिशय संकट काळात मेहता परिवाराने दिलेली मदत म्हणजे मानवता धर्म व सामाजिक ऋण फेडण्याबरोबरच गरजू रुग्णांना लाख-मोलाची मदत मिळणार आहे. मेहता परिवार,निपाणी प्रत्येक वेळी मदतीचा हात देऊन महावीर आरोग्यसेवा संघांमध्ये नवनवीन सेवाकार्य करण्यास संधी उपलब्ध करून देत आहे. ?महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी ह्या रुग्ण सेवा संस्थे दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे. तसेच आपण दिलेली देणगी मानव कल्याणासाठी योग्य पद्धतीने खर्च करेल अशी ग्वाही देत आहे. तसेच मेहता परिवाराचे खूप-खूप आभारी आहे

Donate Now