सौ. विद्या ललितकुमार शाह, पुणे. यांनी आज दि. 05-06-2025 रोजी सेवार्थ दवाखान्यास रुग्णसेवेसाठी- ₹ 5,000/- [₹ पाच हजार] देणगी दिली आहे.
निपाणी येथील सेवार्थ दवाखान्यामधील विश्वस्त व मार्गदर्शक डॉ. श्री विलासभाई पारेख यांचे आत्ते बहीण सौ. विद्या शाह यांनी निपाणीतील अत्याधुनिक तंत्र-सामुग्रीने सुसज्ज, सर्व सुविधा असणारा व या भागातील सर्व समाजातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची विविध वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये आपल्याही परिवाराचे योगदान असावे ह्या उद्देशाने ह्या रुग्ण मंदिरात ₹ 5,000/- ची देणगी दिली आहे.
”शाह परिवाराने” सेवार्थ देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरावर सुकृत कार्य करून ”रुग्णसेवा सहयोग परिवार” म्हणून ओळख निर्माण केली आहे.
आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे. ”शाह” परिवाराचे सर्व विश्वस्ताकडून खूप-खूप आभार.