महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी निस्वार्थपणे अहोरात्र रुग्णसेवा देत आहे. कोरोना महामारी च्या काळात सुद्धा व अन्य आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना फक्त वीस रुपयांमध्ये केसपेपर, रुग्ण तपासणी व तीन दिवसाचे औषध देत आहे. सध्याच्या महागाई काळातही महावीर आरोग्य सेवा संघ कमीत कमी रुपयात इंजेक्शन,सलाईन, औषध उपचार तसेच इतर वैद्यकीय सेवा (Lab test, x-ray) ई. सेवा गेल्या दोन वर्षाहून अधिक काळापासून पुरवीत आहे. या सर्व रुग्णसेवा कार्याची दखल घेऊन ♦️श्री.आशुतोष व सौ.शर्वरी कुलकर्णी. Airmid Health Tech Pvt. Ltd. शिरगाव,बदलापूर (ठाणे) यांनी ?“लाख-मोलाची औषध बँक” रुपी ₹125000/- हून अधिक किमतीचे औषधे मोफत पुरवली आहेत. पट्टणकुडी ह्या छोट्या गावातून कुलकर्णी परिवार व महावीर आरोग्य सेवा संघ मधील विश्वस्तांचे बालपणीचे मित्र—व हे मित्र करीत असलेल्या रुग्णसेवेसाठी आपलाही हातभार लाभावा व्हावा ह्या उद्देशाने कुलकर्णी परिवाराने मदतीचा हात दिला आहे.
आपण दिलेल्या रु.एक लाख पंचवीस हजार रुपयांहून अधिक औषधामुळे रुग्णांना आर्थिक बचत तर होणारच आहे त्याचबरोबर रुग्णांना उपचारासाठी योग्य मदत मिळणार आहे ह्या सर्व रुग्णांचा व रुग्ण परिवारांचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे.