Shri. Samir Hampi Donated Rs. 50,000/- to Dialysis Section in Mahaveer Arogya Seva Sangh, Nipani
Mask Group संचलित
डॉ.सौ.वैशाली & डॉ.विलास पारेख.
महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.
"रुग्णसेवा सहयोग"
स्व. श्री पुरुषोत्तम भीमराव हंपी, पुणे यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव श्री समीर पुरुषोत्तम हंपी, पुणे यांनी आज दि. 15-08-2025 रोजी महावीर आरोग्य सेवा संघ ह्या संस्थेत रुग्ण सेवेसाठी- डायलेसिस विभागात ₹ 50,000/-[पन्नास हजार] देणगी दिली आहे.
निपाणीतील सुप्रसिद्ध सेवार्थ दवाखाना मधील विश्वस्त श्री प्रतीक शहा यांचे मित्र श्री समीर हंपी म्हणजे रंगमंचाचा जाणकार आणि दानशूर व्यक्तिमत्त्व. रंगभूमीच्या दुनियेत काही माणसे अशी असतात जी पडद्यामागे राहूनही संपूर्ण कलाकृतीला जीवंत करतात. असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांनी मराठी नाट्यसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. केवळ एक नाटक व्यवस्थापक म्हणून नव्हे तर प्रत्येक कलाकाराला योग्य मान आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्यातून सर्वोत्कृष्ट कला सादर करून घेणारा एक सच्चा 'कलाकार' म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक नवोदित कलाकारांना अभिनयाचे धडे देत रंगमंचावरील शिस्त, समर्पण आणि कलेप्रती आदर कसा ठेवावा ते देखील त्यांच्याकडून शिकण्यास मिळते अनेक यशस्वी कलाकार आज मोठ्या आदराने त्यांचे नाव घेतात.
श्री समीर यांनी आपल्या वडिल स्व. पुरषोत्तम यांचे स्मरणार्थ निपाणी भागातील सर्व समाजातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची विविध वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये आपल्याही परिवाराचे योगदान असावे ह्या उद्देशाने ह्या रुग्ण मंदिरात ₹ 50,000/- ची देणगी दिली आहे.
हंपी परिवाराने सेवार्थ डायलेसिस विभागात रु. 50 हजार देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरावर सुकृत कार्य करून "रुग्णसेवा सहयोग परिवार" म्हणून ओळख निर्माण केली आहे.
आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे. सेवार्थ दवाखाना तर्फे"हंपी परिवार" चे खूप-खूप आभार.