Mahaveer Charity Hospital

MASK GROUP's

Dr. Sou. Vaishali & Dr. Vilas Parekh

Mahaveer Arogya Seva Sangh, Nipani

Sevarth Hospital

Unknown Person Donated Rs. 25,000/-

Home Unknown Person Donated Rs. 25,000/-
Unknown Person Donated Rs. 25,000/-

Unknown Person Donated Rs. 25,000/-

“एक श्रावक.” यांनी आज दि. 02-05-2025 रोजी सेवार्थ दवाखान्यास रुग्णसेवेसाठी- ₹ 25,000/- [₹ पंचवीस हजार] देणगी दिली आहे.

????नमन त्या उदार हातांना, गुप्त हाताने केले दान।

सेवार्थ दवाखान्यात, अर्पिले अनमोल जीवनदान।।

निपाणी येथील सेवार्थ दवाखान्यामधील विश्वस्त व मार्गदर्शक डॉ. श्री विलासभाई पारेख यांचे परममित्र व एक “अज्ञात श्रावक” यांनी अत्याधुनिक तंत्र-सामुग्रीने सुसज्ज, सर्व सुविधा असणारा व निपाणी भागातील सर्व समाजातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची विविध वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये आपल्याही परिवाराचे योगदान असावे ह्या उद्देशाने देणगी दिली आहे.

ज्या श्रावकाने ही मदत केली आहे त्यांची ओळख जरी गुप्त असली तरी त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. निस्वार्थ भावनेतून केलेले हे दान समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे.

आपल्या या अमूल्य योगदानातून अनेक जीवनांना आधार मिळेल, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. आपले हे कार्य केवळ प्रशंसनीयच नाही तर अनुकरणीय आहे.

आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे. या अज्ञात दात्याच्या उदारतेला आणि सेवाभावी वृत्तीला सेवार्थ दवाखान्यातील प्रत्येक सदस्य विनम्रपणे नमन करतो.

Donate Now